सिनेमातून होणाऱ्या हिंदू देव-देवतांची व हिंदू धर्माची विटंबना....


भारत हा धर्म निरपेक्ष देश आहे, याचा अर्थ बहुसंख्याक हिंदू धर्मियांच्या भावनांचा अनादर करायचा परवाना, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गजर करणाऱ्यांना मिळाला, असे नव्हे. पण, अशा घटनात गेल्या काही वर्षात होत असलेली वाढ, सामाजिक-राष्ट्रीय ऐक्याला सुरुंग लावणारी ठरते. याचे भान पुरोगामित्वाचे ढोल वाजवणाऱ्या तथाकथित परिवर्तनवादी संघटना, राजकीय पक्षांना आणि केंद्र सरकारलाही नाही. एखाद्या नाटक, चित्रपटाच्या विरोधात जनतेने निदर्शने केल्यास पुरोगामी विचारांचे हेच ठेकेदार काव काव करतात. ही झोटिंगशाही विरोधात केंद्र आणि राज्य सरकारांनी कडक कारवाई करायला हवी, अशी त्यांची मागणी असते. पण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडून फक्त हिंदू देव देवतांची विटंबना करणाऱ्या चित्रपट  निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शकांना लगाम लावावा, अशी मागणी मात्र हीच टोळकी करीत नाहीत.   "हॉलंड'मध्ये प्रसिध्द झालेल्या व्यंगचित्राच्या निषेधार्थ भारतातल्या इस्लाम धर्मियांचे मेळावे होतात. ब्रह्म देशातल्या मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराविरुध्द मुंबईत मोर्चे निघतात. प्रसिध्द न झालेल्या पुस्तकावर केंद्र सरकार तडकाफडकी बंदी घालते. इस्लाम धर्मियांच्या भावनांची जपणूक करायसाठी अतिदक्ष असलेले केंद्र सरकार आणि राज्य सरकारे हिंदू धर्मियांच्या दुखावलेल्या-दुखावणाऱ्या भावनांच्या घटनांची त्याच गांभीर्याने दखल घेत नाहीत. पुरोगामी चळवळीतले नेतेही आवाज उठवित नाहीत. हा दुटप्पीपणाचा खेळ स्वातंत्र्यानंतरच्या 64 वर्षांनीही सुरुच आहे. ही दुर्देवी बाब होय. अलीकडेच "माय गॉड' आणि "स्टुडंट ऑफ द इयर' या दोन हिंदी चित्रपटात हिंदू देव-देवतांची प्रछन्न टिंगल टवाळी करणारी दृश्ये आणि संवाद-गीतेही आहेत. चित्रपट नियंत्रण मंडळाने, हे आक्षेपार्ह संवाद-गीते या सवंग, गल्लाभरू चित्रपटातून वगळलेेली नसल्यानेच हिंदुत्ववादी संघटनांनी त्या विरोधात देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनाही केंद्र सरकारच्या उपटसुंभ सर्व धर्म समभावाच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवीत, संसदेतच सरकारला जाब विचारायचा इशाराही द्यावा लागला. अक्षयकुमार आणि परेश रावल निर्माते असलेल्या माय गॉड या चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावतील, असे संवाद आहेत. तर, शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही निर्माती असलेल्या स्टुडंस ऑफ द इयर या चित्रपटातली गाणी हिडिस तर आहेतच, पण हिंदू नावेही संवादात जाणून बुजून वापरण्यात आली आहेत. सीता, राधा, कौशल्या अशी नावे वापरणाऱ्या गौरी खानला अन्य धर्मातली नावे वापरायचे धाडस झाले नाही आणि यापुढेही होणार नाही. हिंदूंच्या भावना पायदळी तुडवल्या तरी चालते आणि ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, अशी समजूत हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अभिनेते-अभिनेत्री, निर्माते आणि दिग्दर्शकांचीही झाली ती, त्यांना मोकाट सोडण्यात सरकारच आघाडीवर असल्याने! या असल्या दर्जाहिन चित्रपटांची निर्मिती करणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतावाद्यांचेही पाठबळ मिळत असल्यानेच! 
स्टुडंटस्‌ ऑफ द इयर या चित्रपटतल्या एका दृश्यात, राधाला नाचता येत नाही. तिला नाच शिकवण्यासाठी रंगमंचावर बोलावले जाते. "राधा लाईक्स्‌ टू मूव्ह', दॅट सेक्सी राधा हे हिडीस गाणे याच चित्रपटातले आहे. या असल्या गाण्याने निर्मात्याला नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, हे सांगायचे कारणही नाही. याच चित्रपटात हिंदूंंना पवित्र असलेल्या गोमातेचीही विटंबना करणारे संवाद आहेत. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी  हिंदू देवदेवतांचा अपमान केल्यामुळे हिंदू धर्मीय संघटनांनी, त्यावर आक्षेप घेतला. पण त्याची दखल नेहमीप्रमाणेच सरकारने घेतली नाही. परिणामी काही संघटनांनी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृहात निदर्शने करायची धमकी दिल्यामुळे, तो प्रदर्शित करायचे धाडस चित्रपट- गृहांच्या मालकांना झाले नाही. तर ओ माय गॉड या चित्रपटावर बंदी घालावी, अशी याचिका प्रमोद पांडे यांनी लखनौच्या न्याय दंडाधिकारी न्यायालयात दाखल केली आहे. याच चित्रपटात परेश रावल गंगेच्या पाण्यात व्हिस्की मिसळून आरतीच्या पात्रात थुंकतो, असे दृश्य आहे. एडस्‌- सारखा मोठा रोग मंदिरामुळेच फैलावतो. असे प्रक्षोभक वाक्यही त्याच्याच तोंडी आहे. हे असले संवाद हिंदू धर्मियांच्या भावनांना चिथावणी देणारे असल्यानेच त्या विरोधात हिंदू संघटनांनी आवाज उठवल्यास ते अयोग्य नव्हे!

Post a Comment

1 Comments

  1. बालीवुड‬ और टीवी सीरियल के नजरिए से ‪हिन्दू‬ को कैसे देखा जाता है एक झलक:----

    *ब्राह्मण* - ढोंगी पंडित, लुटेरा,
    *‪राजपूत* - अक्खड़, मुच्छड़, क्रूर, बलात्कारी
    *वैश्य या साहूकार* - लोभी, कंजूस,
    *गरीब हिन्दू दलित* - कुछ पैसो या शराब की लालच में बेटी को बेच देने वाला चाचा या झूठी गवाही देने वाला
    *सिक्ख*- जोकर आदि बनाकर मजाक उड़ाना
    *जाट* खाप पंचायत का अड़ियल बेटी और बेटे के प्यार का विरोध करने वाला और महिलाओ पर अत्याचार करने वाला

    जबकि दूसरी तरफ

    वही दूसरी और
    *मुस्लिम* - अल्लाह का नेक बन्दा, नमाजी, साहसी, वचनबद्ध, हीरो-हीरोइन की मदद करने वाला टिपिकल रहीम चाचा या पठान।

    *ईसाई* - जीसस जैसा प्रेम, अपनत्व, हर बात पर क्रॉस बना कर प्रार्थना करते रहना।

    ये बॉलीवुड इंडस्ट्री, सिर्फ हमारे धर्म, समाज और संस्कृति पर घात करने का सुनियोजित षड्यंत्र है और वह भी हमारे ही धन से ।
    *हम हिन्दू और सिक्ख अव्वल दर्जे के CARTOON बन चुके हैं।*

    क्योकि ये कभी वीर हिन्दू पुत्रों महाराणा प्रताप ,गुरु गोविन्द सिंह गुरु तेग बहादुर
    चन्द्रगुप्त मौर्य ,अशोक,
    विक्रमादित्य, वीर शिवाजी संभाजी राणा साँगा, पृथ्वीराज की कहानी नही बता सकते।

    कभी गहराई से विचार कीजियेगा…!!

    अगर यही बॉलीवुड देश की संस्कृति सभ्यता दिखाए ..
    तो सत्य मानिये हमारी युवा पीढ़ी अपने रास्ते से कभी नही भटकेगी...
    समझिये ..जानिए और आगे बढिए...

    ये संदेश उन हिन्दू छोकरों के लिए है
    जो फिल्म देखने के बाद
    गले में क्रोस मुल्ले जैसी छोटी सी दाड़ी रख कर
    खुद को मॉडर्न समझते हैं
    हिन्दू नौजवानौं के रगो में धीमा जहर भरा जा रहा है
    फिल्म जेहाद
    *************
    सलीम - जावेद की जोड़ी की लिखी हुई फिल्मो को देखे, तो उसमे आपको अक्सर बहुत ही चालाकी से हिन्दू धर्म का मजाक तथा मुस्लिम / इसाई / साईं बाबा को महान दिखाया जाता मिलेगा. इनकी लगभग हर फिल्म में एक महान मुस्लिम चरित्र अवश्य होता है और हिन्दू मंदिर का मजाक तथा संत के रूप में पाखंडी ठग देखने को मिलते है.

    फिल्म "शोले" में धर्मेन्द्र भगवान् शिव की आड़ लेकर "हेमामालिनी" को प्रेमजाल में फंसाना चाहता है जो यह साबित करता है कि - मंदिर में लोग लडकियां छेड़ने जाते है. इसी फिल्म में ए. के. हंगल इतना पक्का नमाजी है कि - बेटे की लाश को छोड़कर, यह कहकर नमाज पढने चल देता है.कि- उसे और बेटे क्यों नहीं दिए कुर्बान होने के लिए.

    "दीवार" का अमिताभ बच्चन नास्तिक है और वो भगवान् का प्रसाद तक नहीं खाना चाहता है, लेकिन 786 लिखे हुए बिल्ले को हमेशा अपनी जेब में रखता है और वो बिल्ला भी बार बार अमिताभ बच्चन की जान बचाता है. "जंजीर" में भी अमिताभ नास्तिक है और जया भगवान से नाराज होकर गाना गाती है लेकिन शेरखान एक सच्चा इंसान है.

    फिल्म 'शान" में अमिताभ बच्चन और शशिकपूर साधू के वेश में जनता को ठगते है लेकिन इसी फिल्म में "अब्दुल" जैसा सच्चा इंसान है जो सच्चाई के लिए जान दे देता है. फिल्म "क्रान्ति" में माता का भजन करने वाला राजा (प्रदीप कुमार) गद्दार है और करीमखान (शत्रुघ्न सिन्हा) एक महान देशभक्त, जो देश के लिए अपनी जान दे देता है.

    अमर-अकबर-अन्थोनी में तीनो बच्चो का बाप किशनलाल एक खूनी स्मग्लर है लेकिन उनके बच्चों अकबर और अन्थोनी को पालने वाले मुस्लिम और ईसाई महान इंसान है. साईं बाबा का महिमामंडन भी इसी फिल्म के बाद शुरू हुआ था. फिल्म "हाथ की सफाई" में चोरी - ठगी को महिमामंडित करने वाली प्रार्थना भी आपको याद ही होगी.

    कुल मिलाकर आपको इनकी फिल्म में हिन्दू नास्तिक मिलेगा या धर्म का उपहास करता हुआ कोई कारनामा दिखेगा और इसके साथ साथ आपको शेरखान पठान, DSP डिसूजा, अब्दुल, पादरी, माइकल, डेबिड, आदि जैसे आदर्श चरित्र देखने को मिलेंगे. हो सकता है आपने पहले कभी इस पर ध्यान न दिया हो लेकिन अबकी बार ज़रा ध्यान से देखना.

    केवल सलीम / जावेद की ही नहीं बल्कि कादर खान, कैफ़ी आजमी, महेश भट्ट, आदि की फिल्मो का भी यही हाल है. फिल्म इंडस्ट्री पर दाउद जैसों का नियंत्रण रहा है. इसमें अक्सर अपराधियों का महिमामंडन किया जाता है और पंडित को धूर्त, ठाकुर को जालिम, बनिए को सूदखोर, सरदार को मूर्ख कामेडियन, आदि ही दिखाया जाता है.

    "फरहान अख्तर" की फिल्म "भाग मिल्खा भाग" में "हवन करेंगे" का आखिर क्या मतलब था ? pk में भगवान् का रोंग नंबर बताने वाले आमिर खान क्या कभी अल्ला के रोंग नंबर 786 पर भी कोई फिल्म बनायेंगे ? मेरा मानना है कि - यह सब महज इत्तेफाक नहीं है बल्कि सोची समझी साजिश है एक चाल है ।

    यदि सहमत हों तो सर्वत्र फैलायै⛳🕉⛳🕉⛳🙏⛳🙏⛳🙏⛳🙏

    ReplyDelete