त्रिपुराचा निकाल तथा बीजेपीने तेथे अजिबात मूळ नसताना गेली २ वर्षे मराठी स्वयंसेवकांच्या माध्यमातून काय, काय केले हे आत्ताच वाचा 👇
*फूट सोल्जर्स*
काहीही जनाधार नसलेल्या राज्यात निवडणूक लढवायची म्हणजे खायचे काम नसते !! तीन वर्षात मुळापासून पक्ष बांधून "बॅटल रेडी" करण्याची जबाबदारी सुनील वर टाकली होती. ते कसे केले हा मोठा विषय आहे. आज मी मला माहिती असलेल्या काही कार्यकर्त्यांबद्दल लिहिणार आहे.
श्रावण चे लग्न होऊन जेमतेम सहा महिने झाले असतील !! पण सुनीलच्या हाकेला ओ देऊन त्याने गेले आठ महिने त्रिपुरात तळ ठोकला आहे !! भाजयुमोची जबाबदारी पार पाडली !! "एक बूथ दस युथ" ही अमित शहा यांनी सुचवलेली रचना त्याने यशस्वीपणे अंमलात आणली. त्रिपुरात ३२१४ बूथ आहेत !! म्हणजे त्याच्या मेहनतीची कल्पना येईल !! राज्य पिंजून काढल्याशिवाय हे शक्य नव्हते !! त्याची नवपरिणीत पत्नी काही दिवसांनी त्रिपुरातआली. आगरताळ्यात वॉर-रूम मधे काम करत होती !!
पराग हा कट्टर संघ स्वयंसेवक जवळपास वर्षभर दुर्गम भागात जनजातीत फिरत होता आपल्याकडे कसे आदिवासी पाडे असतात तशा प्रकारच्या वस्त्यांमधून जनजागृती केली !! संघाच्या रचनेतून केली !! भाजपचा झेंडा न घेता केली !! त्याच्याकडून तुम्ही तेथील हलाखीचे किस्से ऐकाल तर अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी येईल !! आपण स्वर्गात आहोत असे समजा !!
वर्षभरात दहाच्या वर भाजप कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला. कदाचित आकडा जास्त असेल !! जखमी तर अनेक झाले !! इतकी दहशत होती की आम्ही टुरिस्ट म्हणून गेलो होतो तरी सावधगिरी म्हणून सुनीलने गाडीवरचा भाजपचा झेंडा काढायला लावला. अजित माळी हा सुनीलचा सिक्युरिटी इन चार्ज होता !! वॉकी टॉकी घेऊन दहा बारा तगड्या तरुणांची टीम घेऊन सावलीसारखा सुनीलबरोबर असतो. त्याचेही लग्न नुकतेच झाले आहे !!
शिवानंद नाडकर्णी हा आमचा टी ब्रेक अड्ड्याचा मेंबर !! निवांत आयुष्य सोडून तो त्रिपुरात जवळपास वर्षभर मुक्काम ठोकून होता !! तो "बहिर्जी नाईक" होता इतकेच सांगता येईल !!
सुमंत कोकरे हा बारामतीचा स्वयंसेवक स्वतःच्या जीवावर ,पदरमोड करून पोचला !! त्याला खैरपूर मतदारसंघात काम दिले !! नॉर्मली तिथे बरीच हिंसा होते !! यावेळी लालभाईंची हिंमत झाली नाही !! त्याने त्याचे अनुभव लिहावेत. खूप भरभरून बोलत होता !!
अस्मादिक आणि माझा मित्र सिनिअर चार्टर्ड अकौंटंट किशोर सात्विक दोन दिवस जाऊन आमच्यायोग्य एक छोटेसे मिशन पार पाडून आलो !! आपली फूल ना फुलाची पाकळी !! पैशाची भयानक लूट कशी होत होती त्याचे विदारक चित्र नजरेसमोर आले.
प्रज्ञा बर्डे आणि समीर देवधर यांच्याबद्दल आधीच लिहिले होते !!
सरतेशेवटी पुण्यातील २७ वर्ष वयाचा स्वयंसेवक अद्वैत कुलकर्णी !! मेकॅनिकल इंजिनीअर, उत्तम नोकरी, घरचा व्यवसाय !! सुनीलला फेसबुकवर फॉलो करत होता. तीन वर्षे तो सतत पक्षाचे काम द्या अशी विनंती करत होता !! दोन वेळा भेटला. सुनीलने त्याला बोलावून घेतले.ऑगस्ट २०१७ मधे त्रिपुराला आला. चॉमनु मतदारसंघात त्याला पाठवले. त्याने इतक्या उत्तम रीतीने काम केले की सर्व नेते खुश झाले. तिथे १४ फेब्रुवारीला अमित शहा यांची सभा झाली !! तुफान यशस्वी झाली !!
सभेनंतर नेत्यांच्या मीटिंगमधे बोलताना अमितभाई सुनीलला म्हणाले "वो तुम्हारा पूना का लाडका है ना कुलकर्णी बहोत अच्छा है " याहून मोठी पावती काय असेल ? निवडणूक आटोपली ,निकाल काहीही लागले तरी ऑगस्टपर्यंत राहून एक वर्ष पूर्ण करण्याचा त्याचा इरादा आहे !!
संघाच्या मुशीतून असे कार्यकर्ते तयार होतात आणि भविष्यात नेते होतात !! जमिनीवर पाय असणे गरजेचे असते. पण संघसंस्कार शक्यतो भरकटू देत नाहीत !!
असे अनेक जण आहेत !! त्या सर्वांनी मेहनत घेतली आहे !! अनवधानाने उल्लेख राहून गेला असेल. स्थानिक मनुष्यबळ कमी होते !! जे होते ते मानसिकरित्या खचून गेले होते !! त्यांना उभे करण्यासाठी देशभरातून तरुणाई गोळा केली !! तिकीटवाटपात युवकांना प्राधान्य दिले आहे !! आज भाजप विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे !! लाट आहे असे संकेत आले आहेत.
एका मतदारसंघात सरासरी ४०००० व्होटर्स आहेत. अंतिमतः ९०% च्या आसपास मतदान झाले आहे. एखादा अपवाद वगळता सर्व Exit Polls भाजप जिंकेल असेच सांगत आहेत !! पण सगळे निकाल जाहीर होईपर्यंत थांबणे शहाणपणाचे आहे !! मार्जीन्स लहान असली तर प्रत्येक फेरीनंतर चित्र बदलू शकते.
निकाल लागण्याआधी या तरुणांबद्दल लिहिले कारण नंतर फोकस नेत्यांवर जातो !! या तरुणांकडून स्फूर्ती घेऊन भविष्यात जास्तीत जास्त तरुण जोडले जाणे गरजेचे आहे !!
देशाच्या नकाशावर त्रिपुरा एक ठिपका आहे !! ही लहान असली तरी कम्युनिस्टांविरुद्ध असल्याने खूप महत्त्वाची लढाई होती...
0 Comments