कॉंग्रेसच्या पुस्तिकेत 'भारत व्याप्त काश्मीर' असा उल्लेख...

कॉंग्रेस पक्षातर्फे "राष्ट्रीय सुरक्षा पर आँच" या विषयावर एका पुस्तिकेचे १ जून रोजी अनावरण झाले आहे. त्यात काश्मीरचा उल्लेख चक्क "भारत व्याप्त काश्मीर" असा करण्यात आला आहे. त्यामुळे सगळी कडूनच टीकेची झोड कॉंग्रेसवर उठत आहे.

आसाम प्रदेश कॉंग्रेस समिती तर्फे जेष्ठ कॉंग्रेस नेते शकील अहमेद यांच्या हस्ते या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय सुरक्षा याविषयी सविस्तर लिखाण केले गेले आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्या तयार होत असलेला महामार्ग पाक व्याप्त काश्मीर मधून जात आहे, त्यामुळे कॉंग्रेसने यावर आपत्ती घेतली आहे, परंतु त्यात काश्मीरचा उल्लेख भारत व्याप्त काश्मीर केला आहे.

यावर भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपत्ती दर्शवित लिहिले आहे की, कॉंग्रेसने या पुस्तिकेत पान क्र. १२ वर भारत व्याप्त काश्मीर असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष पाकिस्तानला पाठींबा देत आहे की काय अशी शंका उत्पन्न होते. त्यात त्यांनी कॉंग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ, असे वर्णन केले आहे.

Post a Comment

0 Comments